For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chandoli Dam | वारणावती कॉलनीत अजगरांचा वाढता वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

12:27 PM Apr 01, 2026 IST | NEETA POTDAR
chandoli dam   वारणावती कॉलनीत अजगरांचा वाढता वावर  ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Advertisement

           चांदोली धरण परिसरात वन्यप्राण्यांची दहशत;

Advertisement

शितुर बारुण - चांदोली धरण पायथ्याशी व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या वारणावती कॉलनी परिसरात सध्या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून या भागात अजगरांचे जणू साम्राज्यच निर्माण झाले असून, वारंवार घडणाऱ्या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे सोमवारी सायंकाळी वारणावती को तनी परिसरात एका अवाढव्य अजगर ग्रामस्थांना दिसला.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेला लागूनच डी कॉलनी असल्याने येथे नेहमीच वन्यजीवांची वर्दळ असते नात्र, गेल्या वर्षभराचा काळ पाहता, या भागात अजगर, गवे, बिबटे येण्याचे प्रमाण लक्षणीय आहे वन विभागाने वर्षभरात या परिसरातूनचार ते पाचवेळा मोठ्या अजगरांना सुरक्षितपणे रेस्क्यू (बचाव) केले आहे काही दिवसांपूर्वी येथील न्यू इंग्लिश स्कूल परिसरात रात्रीच्यावेळी दोन मीठे अजगर आढळले होते. वनविभागाच्या पथकाने या अजगरांना पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले असले तरी, शाळेच्या आवारातच अशा धोकादायक प्राण्यांचा वावर वाढत्याने पालकांना चिंता आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

Advertisement

स्वच्छता मोहीम आणि नागरिकांची मागणी
वारणावती कॉलनीमध्ये कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. पावसामुळे वाढलेले गवत आणि झाडी यामुळे हे सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत, सम्या वनविभागाच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलकांच्या मागणीनुसार, कॉ लनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे, वारंवार होणाऱ्या हिंस्र प्राण्यांच्या दर्शनामुळे वनविभागाने या परिसरात गस्त वाढवावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ वरवरधी स्वच्छता न करता, पुन्हा शाडे-झुडपे वाढणार नाहीत पाथी प्रशासनाने दक्षता घ्यावी, तरच या मोकादायक प्राण्यांचा प्रादुर्भाव कमी होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.