महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राकसकोप जलाशयातून विसर्ग वाढविला

11:39 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/तुडये

Advertisement

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात संततधार पावसाने जोर सलग पाचव्या दिवशीही दिल्याने जलाशयाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाण्याचा वाढता ओघ पाहून जलाशयाच्या सहा दरवाजांपैकी चार दरवाजे उघडण्यात आल्याने मार्कंडेय नदीच्या पुरात पुन्हा वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी पाणीपातळी 2476.30 फूट नोंद झाली होती. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने सायंकाळी सहा वाजता पाणीपातळी 2477 फुटावर पोहोचली. गुरुवारी सायंकाळी तीन दरवाजे 10 इंचांनी खुले करूनही पाणीपातळी निश्चित ठेवता आली नाही.

Advertisement

शुक्रवारी दुपारी 3 वाजता क्र. 6 चा दरवाजा 4 इंचांनी उघडण्यात आला. क्रमांक 2, 4 व 5 हे तीन दरवाजे दीड फुटांनी उघडण्यात आल्याने प्रचंड विसर्ग मार्कंडेय नदीत सुरू झाला आहे. तसेच संततधार पावसामुळे जलाशयाला मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. शुक्रवारी सकाळी 95.4 मि.मी. तर एकूण 1667.8 मि.मी. पाऊस झाला आहे. दि. 22 जुलैपासून पाच दिवसांत 450 मि.मी. पाऊस झाल्याने संपूर्ण नाल्याची पूरमय अवस्था बनली आहे. तीन दरवाजे दीड फुटाने खुले केल्याने मार्कंडेय नदीला मिळणाऱ्या सर्वच नाल्यांच्या पुरामुळे पिके नुकसानीत जाणार आहेत. रात्री 8 वाजता पाण्याचा ओघ वाढल्याने पाणीपातळीत अर्ध्या फुटाने वाढ झाल्याने दरवाजा क्रमांक 2 व 3 हे 3 इंचांनी तर 5 क्रमांक 2 इंचांनी वाढ करून खुले केले आहेत. जलाशयाच्या वेस्टवेअरचे 2 व 3 क्रमांकाचे दोन दरवाजे पावणे दोन फुटाने, पाच क्रमांकाचा दरवाजा दीड फुटाने तर सहा क्रमांकाचा दरवाजा सहा इंचांनी खुला करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article