For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. आंबेडकर निवासी शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवा

11:11 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ  आंबेडकर निवासी शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवा
Advertisement

मादिग आरक्षण संघर्ष समितीचे निवेदन

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर हे एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे केवळ जिल्ह्यातीलच नाही तर जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी शिक्षणासाठी बेळगावमध्ये येतात. बेळगावमध्ये अनुसूचित जाती-जमाती तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी शाळा सुरू आहे. या शाळेमध्ये दरवर्षी 125 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही संख्या 150 करावी, अशी मागणी मादिग आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने समाजकल्याणमंत्री डॉ. एस. सी. महादेवप्पा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

अनुसूचित जाती-जमाती तसेच मागासवर्गीयांच्या मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. अनेक पालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांना निवासी शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. परंतु, निवासी शाळेत मर्यादित संख्या असल्याने पालकांवर आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे निवासी शाळेच्या संख्येमध्ये वाढ करण्याची मागणी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रमुख बसवराज अरवळ्ळी, उपाध्यक्ष यल्लाप्पा हुदली, सुभाष हुल्लेन्नावर, प्रकाश तळवार, संदीप कोलकार यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.