For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी चलन साठ्यात 9 अब्ज डॉलर्सची वाढ

06:35 AM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
विदेशी चलन साठ्यात  9 अब्ज डॉलर्सची वाढ
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

देशाचा विदेशी चलन साठा 3 एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये 9.063 अब्ज डॉलर्सने वाढत चलन साठा 697.121 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी संदर्भातली माहिती दिली आहे.

याच्या मागच्या आठवड्यात विदेशी चलन साठा 10.28 अब्ज डॉलर्सने कमी होत 688.05 अब्ज डॉलर्सवर राहिला होता. याचवर्षी 27 फेब्रुवारी रोजी देशाचा विदेशी चलन साठा 728.494 अब्ज डॉलर्स या सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता.

Advertisement

सुवर्ण साठा 7 अब्ज डॉलर्सने वाढला

3 एप्रिलच्या संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन मालमत्तेमध्ये 1.784 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.  सुवर्ण साठा 7.221 अब्ज डॉलर्सने वाढून 120.742 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

Advertisement
Tags :

.