For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी चलन साठ्यात 6.29 अब्ज डॉलर्सची वाढ

06:36 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
विदेशी चलन साठ्यात 6 29 अब्ज डॉलर्सची वाढ
Advertisement

मुंबई : 

Advertisement

8 मे रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 6.29 अब्ज डॉलर्सने वाढत 696.99 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. सोन्याच्या साठवणुकीमध्ये झालेल्या वाढीचा परिणाम विदेशी चलन साठ्याच्या वाढीमध्ये दिसून आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. 8 मेच्या सदरच्या आठवड्यात देशाचा सुवर्णसाठा 5.64 अब्ज डॉलर्सने वाढला होता.

याच आठवड्यात पाहता सोन्याच्या किमतीमध्ये 2.11 टक्के वाढ झाली होती. दुसरीकडे देशाची विदेशी चलन मालमत्ता 562 दशलक्ष डॉलर्सने वाढली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी राखीव साठा 12 दशलक्ष डॉलर्सने वाढत 4.87 अब्ज डॉलर्सवरती स्थिरावला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.