विदेशी चलन साठ्यात 1.08 अब्ज डॉलरची वाढ
06:44 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
17 जुलैला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 1.08 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. या वाढीसोबत देशाचा विदेशी चलन साठा 676.237 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलनसाठा 964 दशलक्ष डॉलरने वाढत 675.157 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. सदरच्या आठवड्यामध्ये रुपयांवरती मोठ्या प्रमाणात दबाव पहायला मिळाला. पश्चिम आशियातील युद्धाचे संकट कायम असल्याने बाजारामध्ये घसरण पहायला मिळते आहे. 24 जुलैला संपलेल्या आठवड्यात पाचही दिवस शेअरबाजार घसरणीत राहिला.
Advertisement
Advertisement