8 कंपन्यांच्या मूल्यात 1.87 लाख कोटींची वाढ
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलच्या मूल्यात सर्वाधिक वाढ : एचडीएफसी बँक नुकसानीत
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बाजार भांडवलाच्या तुलनेत आघाडीवरच्या दहापैकी 8 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1.87 लाख कोटींची वाढ मागच्या आठवड्यात झाली असल्याची माहिती आहे. यामध्ये दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे मूल्य सर्वाधिक वधारलेले दिसून आले. यांच्या मूल्यात 58,831 कोटींची वाढ होऊन 11.25 लाख कोटी रुपयांवर बाजार भांडवल पोहचले.
जीवन विमा क्षेत्रातील कंपनी एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 27,608 कोटींनी वाढत 5.32 लाख कोटींवर पोहचले आहे. आयटी क्षेत्रातील टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 20,731 कोटींनी वाढत 9.34 कोटी रुपयांवर पोहचले आहे. बाजार भांडवल मूल्यात आघाडीवरची रिलायन्स, लार्सन टुब्रो, आयसीआयसीआय बँक, एसबीआय व इन्फोसिस यांच्या मूल्यातही वाढ झाली आहे. रिलायन्सच्या बाजार भांडवल मूल्यात 20231 कोटींची भर पडली असून एकंदर बाजार भांडवलमूल्य 18.47 लाख कोटींवर पोहचले.
यांचे मूल्य घटले
दुसरीकडे एचडीएफसी बँकेचे मूल्य मागच्या आठवड्यात कमी झालेले दिसून आले आहे. बँकेचे बाजारमूल्य 16,163 कोटी रुपयांच्या घसरणीसह 12.31 लाख कोटी रुपयांवर तर बजाज फायनान्सचे 9769 कोटी रुपयांनी कमी झाले होते.
कंपनी आठवड्यातील सध्याचे बाजार मूल्य
वाढ कोटी रु. लाख कोटी रु.
एअरटेल 58,831 11.25
एलआयसी 27608 5.33
टीसीएस 20731 9.34
रिलायन्स 20231 18.47
एल अँड टी 18,577 5.63
आयसीआयसीआय 18266 9.65
एसबीआय 12599 9.97
इन्फोसिस 10650 5. 34