For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमर्शियल सिलिंडरच्या दरात वाढ

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कमर्शियल सिलिंडरच्या दरात वाढ
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

तेल विपणन कंपन्यांनी कमर्शियल सिलिंडरचे दर नव्या महिन्यात वाढविले आहेत. 19 किलोग्रॅमच्या सिलिंडरच्या किमतीत प्रमुख शहरांमध्ये 9.50 रुपयांपासून 11.50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर देशांतर्गत उ•ाणांसाठी विमान इंधन म्हणजेच एटीएफची किंमतही वाढली आहे. एटीएफची किंमत 6.28 रुपयांनी वाढत प्रतिलिटर 121.28 रुपये झाली आहे. 5 किलेग्रॅमच्या बिगर घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरची किंमतही 2 रुपयांनी वाढली आहे. याची किंमत 762 रुपयांवरून वाढत 764 झाली आहे. तर 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर सलग तिसऱ्या महिन्यातही स्थिर आहेत. सलग 2 महिन्यांमध्ये दरकपातीनंतर कमर्शियल सिलिंडरचे दर सप्टेंबरमध्ये वाढविण्यात आले आहेत. सर्वाधिक 11.50 रुपयांची वाढ कोलकात्यात झाली आहे. दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, नोएडा, चंदीगड आणि लखनौमध्ये 19 किलोग्रॅम सिलिंडरची किंमत 9.50 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत आता या कमर्शियल सिलिंडरची किंमत 2,747.50 रुपये झाली आहे. तर मुंबईत याची किंमत वाढून 2,701 रुपयांवर पोहोचली आहे. चेन्नईत 10.50 रुपयांनी किंमत वाढून 2,916.50 रुपयांना हा सिलिंडर मिळणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.