For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात तीन वर्षांत कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ

11:15 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात तीन वर्षांत कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ
Advertisement

दोन हजारांहून अधिक रुग्णांची भर : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, तीन वर्षांत सुमारे 40 लाख रुग्णांची तपासणी

Advertisement

बेळगाव : कॅन्सर प्रतिबंधक दिन बुधवारी दि. 4 रोजी जगभर आचरणात येत असतानाच एका  बेळगाव जिल्ह्यात तीन वर्षांत दोन हजाराहून अधिक कॅन्सरचे रुग्ण आढळून आल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. अलीकडे कॅन्सर हा सर्वसामान्य रोग झाल्याचे दिसून येत आहे. तोंड, स्तनाचा कॅन्सरची प्रकरणे अधिक प्रमाणात आहेत. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिह्यातील सर्व तालुका आणि समुदाय आरोग्य केंद्रांमध्ये कॅन्सर बरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत तोंड, स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सर रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात येत असतात.

जिह्यात गेल्या तीन वर्षांत सुमारे 40 लाख रुग्णांची तपासणी करून त्यांच्यात कर्करोगाची लक्षणे शोधण्यात आली. यापैकी 2420 जणांमध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून आली. यामध्ये तोंड व स्तनाच्या कॅन्सरचे रुग्णच अधिक दिसून आले आहेत. सरकारने अलिकडेच जारी केलेल्या गृहआरोग्य योजनेंतर्गत कॅन्सरचे रुग्ण दिसून येत आहेत. सुरुवातीच्या काळात कॅन्सरवर इलाज झाल्यास तो आटोक्यात आणता येणे शक्य आहे. त्यामुळे वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे योग्य असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडे कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबिरे भरवून कॅन्सरचे रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार कऱण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गडाद यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

Advertisement

जिल्ह्यात तीन वर्षांत आढळलेले कॅन्सरचे रुग्ण 

  • 2023-24-828
  • 2024-25-895
  • 2025-26-696
Advertisement
Tags :

.