महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डीआरडीओ प्रमुख कामत यांच्या कार्यकाळात वाढ

06:28 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बंगालच्या मुख्य सचिवांना तीन महिन्यांचा सेवाविस्तार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) डॉ. समीर व्ही. कामत यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढविण्यात आला आहे. भारत सरकारने सोमवारी कामत यांच्या सेवाविस्ताराला मंजुरी दिली आहे. विस्तारानंतर डॉ. कामत हे 31 मे 2025 पर्यंत डीआरडीओचे अध्यक्ष असणार आहेत. डॉ. कामत हे डीआरडीओ अध्यक्षासमवेत संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव देखील आहेत.

याचबरोबर पश्चिम बंगालचे मुख्य सचिव भगवती प्रसाद गोपालिका यांच्याही कार्यकाळात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोपालिका आता आणखी तीन महिन्यांसाठी मुख्य सचिव म्हणून कार्यरत असतील. गोपालिका हे शुक्रवारी सेवानिवृत्त होणार होते, परंतु आता ते 31 ऑगस्टपर्यंत राज्याचे मुख्य सचिव म्हणून कायम असणार आहेत. गोपालिका हे 1989 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. 31 डिसेंबर 2023 रोजी एच.के. द्विवेदी यांच्या सेवानिवृत्तीनंतर गोपालिका हे राज्याचे मुख्य सचिव झाले हेते. त्यापूर्वी ते गृहसचिव म्हणून कार्यरत होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article