सणासुदीच्या काळात एफएमसीजीच्या विक्रीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिवाळीच्या सणानिमित्त फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) च्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज निश्चित करुन किराणा दुकानांनी अशा उत्पादनांचा साठा वाढवला आहे. रिटेल इंटेलिजेंस फर्म बिझोमच्या डेटावरून हे उघड झाले आहे. काही काळापूर्वी ग्रामीण बाजारपेठेत एफएमसीजी उत्पादनांची मागणी कमी होती परंतु सणासुदीच्या काळात चांगली मागणी दिसून येत आहे. ग्रामीण बाजारपेठेतील मागणी सर्व एफएमसीजी श्रेणींमध्ये दुहेरी आकड्यांमध्ये वाढत आहे.
अक्षय डिसोझा, बिझोमचे ग्रोथ आणि इन्साइट्सचे प्रमुख म्हणाले, स्नॅक्स, शीतपेये आणि पॅकेज्ड फूड उत्पादनांच्या गिफ्ट पॅकच्या मागणीत सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. ते म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने ब्रँडेड वस्तूंच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
एकूणच एफएमसीजी उद्योगाच्या वाढीवर याचा मोठा परिणाम होतो.‘
तथापि, शॅम्पूपासून मॉइश्चरायझरपर्यंतच्या उत्पादनांच्या विक्रीवर दबाव कायम आहे कारण ग्राहक या उत्पादनांवर अधिक खर्च करणे टाळत आहेत.
डिसोझा म्हणाले, ‘या वर्षीही दिवाळीच्या काळात किरकोळ दुकानांमध्ये उत्पादनांना स्थान मिळवून देण्यासाठी चढाओढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक खप निश्चित करण्यासाठी आम्हाला उत्पादनांच्या विक्रीची प्रतीक्षा करावी लागेल. पुढील महिन्यात हे स्पष्ट होईल कारण आम्ही स्टोअरमधील स्टॉकवर लक्ष ठेवून राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.