पेट्रोल-डिझेल विक्रीत वाढ
06:05 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
गेल्या जुलै महिन्यामध्ये पेट्रोलची विक्री 10 टक्क्यांनी आणि डिझेलची विक्री 4 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तेल मंत्रालयाने यासंदर्भात ही माहिती दिलीय.
तेल मंत्रालयाने माहिती देताना विमानाच्या इंधनाच्या (जेट फ्युल)वापरामध्ये 9 टक्क्यांची वाढ झाल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे जुलैमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या वापरामध्ये 11 टक्के वाढ दिसून आली आहे. कार तसेच दुचाकी विक्रीमध्ये झालेल्या वाढीमुळे पेट्रोलची मागणी जुलैमध्ये अधिक दिसून आली.
Advertisement
डिझेलचा वाटा अधिक
सर्व इंधनांच्या वापरामध्ये पाहता डिझेलचा वाटा 40 टक्के इतका असतो. सार्वजनिक बस वाहतुकीसह ट्रक व इतर मालवाहतुकीची वाहने बऱ्याच अंशी डिझेल इंधनावर धावणारी असतात. पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये पेट्रोल आणि डिझेलची विक्री लक्षणीयरित्या वाढलेली दिसते.
Advertisement