For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णांमध्ये वाढ

12:08 PM May 28, 2025 IST | Radhika Patil
व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णांमध्ये वाढ
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम झाला असून डास,बुरशी बॅक्टेरिया, यांच्याशी थेट संबंध अल्याने रूग्ण वाढत आहत़े लहानग्यांना वायोवृध्दाना या व्हायरल इन्फेक्शनचा सर्वा]िधक त्रास होत आह़े रूग्णाना व्हायर फिव्हर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले दुकानांत औषधे घेण्यासाठी मोठया प्रमाणात रूग्णांची गर्दी दिसून येत़े चार ते पाच दिवसांपासून जिल्हयातील पावसाने धुमाखोळ घातला आह़े यावातावरणाचा आरोग्यावर परिणाम होताना दिसत आह़े

मे हा कडक उन्हाचा महिना आह़े मात्र दोन ते पाच दिवसापासून पावसाचा परिणाम जाणवत असून यांचा आरोग्यावर परिणाम होत आह़े थंडी क्वचित उन्ह,पाऊस, काही ठीकाणी कमी पाऊस असे वातावरण आह़े खाजगी दवाखान्यांत ओपीडी वाढले आह़े सी पी आरमधील बाहयारूग्ण विभागात आणि खाजगी दवाखान्यात रुग्णसंख्या वाढली आहे.

Advertisement

  • रुग्णांनी याची काळजी घेणे आवश्यक 

एसीचा वापर कमी कराव़ा

थंड पदार्थ खाऊ नयेत़

बाहेरील अन्नपदार्थ शक्यातो टाऴा

शिळे अन्नपदार्थ खाऊ नक़ा

आंबट फळे मर्यादित खावे

बाहेरील पाणी पिणे टाऴा

  • रुग्णसंख्येत १० टक्के वाढ 

सकस आहार घ्यावा लहान मुले,वृध्दाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नय़े वातावरणामुळे बदल जाणवत असून व्हायरल इन्फेक्शनचे रूग्ण व्ढात आहेत़ ओपीडीत अशा रूगणाची 10 टक्केनी वाढ होताना दिसत आह़े पाणी उकळून थंड करून प्याव़े
                                                                                                                                         - ड़ॉ अस्मिता पाटील़

Advertisement
Tags :

.