For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताकडून सैनिकांच्या संख्येत वाढ, चीन अस्वस्थ

06:33 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताकडून सैनिकांच्या संख्येत वाढ  चीन अस्वस्थ
Advertisement

तणाव कमी करण्यास अडथळे निर्माण होणार असल्याचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

मागील 4  वर्षांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने स्वत:चे सैनिक तैनात केले आहेत. तर भारताने एलएसीवरील स्वत:च्या सैनिकांची संख्या वाढविण्याचे पाऊल उचलल्यावर चीन नाराजी व्यक्त करू लागला आहे. भारताच्या या पावलामुळे सीमेवरी तणाव कमी करण्यास मदत होणार नसल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. चीनला लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने मोठ्या संख्येत सैनिक तैनात केले आहेत.

Advertisement

पाकिस्तानला लागून असलेल्या पश्छाम सीमेवर तैनात 10 हजा सैनिकांच्या एका युनिटला चीनला लागून असलेल्या सीमेच्या एका हिस्स्याच्या रक्षणासाठी पुन्हा तैनात करण्यात आल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी स्वत:चे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली आहे. याचबरोबर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात 9 हजार सैनिक आता एका नव्याने स्थापन कॉम्बॅट कमांडचा हिस्सा असणार आहेत. या कमांडकडे 532 किलोमीटर लांब सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.

भारत आणि चीनदरम्यान 5 मे 2020 पासून तणाव आहे. दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान सीमेवर विविध ठिकाणी झटापट झाली होती. लडाख क्षेत्रातील गलवान नदीच्या खोऱ्यात भारताकडून निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या निर्मितीवर चीनने आक्षेप घेतल्यावर तणाव वाढला होता. त्यानंतर दोन्ही देशांनी अनेक फेऱ्यांमध्ये सैन्य तसेच राजनयिक स्तरावर चर्चा करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तणावपूर्ण संबंधांच्या प्रत्युत्तरादाखल भारताने चिनी गुंतवणूक आणि चिनी उद्योगांच्या प्रस्तावांना रोखण्याचे पाऊल उचलले आहे.

Advertisement
Tags :

.