For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ

11:51 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ
Advertisement

वातानुकूलित बसेसनाही पसंती

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव एक दिवसावर येऊन ठेपल्याने प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकात गुरुवारी प्रवाशांची संख्या वाढली होती. विविध ठिकाणांहून चाकरमान्यांसह प्रवासी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे तिकीट काऊंटरही फुल्ल होऊ लागले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने बेंगळूर, पुणे, मुंबई मार्गांवर जादा बसेसची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर खासगी बसेसही धावू लागल्या आहेत. गणेशोत्सव सणासाठी आपल्या मूळ गावी परतणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. त्यानुसार मुंबई, पुणे, बेंगळूर व गोव्यातूनही प्रवासी येऊ लागले आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये गर्दी वाढू लागली आहे. विशेषत: रात्रीसाठी धावणाऱ्या वातानुकूलित बससेवेवरही प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढला आहे. बेंगळूरसाठी धावणाऱ्या बसेसना महिला प्रवाशांची अधिक पसंती दिसत आहे. शक्ती योजनेमुळे राज्यांतर्गत प्रवास मोफत सुरू आहे. मात्र, पुणे आणि मुंबईसाठी धावणाऱ्या विशेष बसना तिकीट मोजावे लागत आहे. त्याचबरोबर खासगी बसधारकांनी वाढत्या प्रवाशांच्या संधीचा फायदा घेत तिकीट दरात वाढ केल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक फटकाही बसू लागला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.