For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताकडून चीनला निर्यातीत वाढ

06:38 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताकडून चीनला निर्यातीत वाढ
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताकडून चीनला निर्यात वाढली असून यामध्ये लोह खनिज आणि सुती धाग्यांचा वाटा लक्षणीय राहिला असल्याची माहिती समोर येते आहे. भारताने चीनला निर्यात होणाऱ्या एकूण वस्तूंपैकी एकूण 90 वस्तूंचा वाटा हा 67 टक्के इतका राहिला असल्याची माहिती आहे. उर्वरीत 71 वस्तूंचा निर्यातीतील वाटा हा 32 टक्के राहिला असल्याचे सांगितले जात आहे.

चीनला एकूण 161 वस्तूंची निर्यात केली जात आहे. मागच्या वर्षी यापैकी 90 प्रमुख वस्तूंच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे. यामध्ये लोह खनिज, दूरसंचार उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश आहे. भारताकडून होणारी मागच्या वर्षाची निर्यात ही चार स्तरावर पाहता दहा कोटी डॉलरपेक्षा अधिक राहिली आहे.

Advertisement

लोहखनिज, सुती धागा यांची निर्यात

2023 मध्ये लोह खनिजाची निर्यात तब्बल 216 टक्के वाढली असून 3.33 अब्ज डॉलर्स किमतीची निर्यात करण्यात आली आहे. यासोबत सुती धाग्याची निर्यात देखील 542 टक्के इतकी जबरदस्त वाढली असून त्यातून 61.11 कोटीची प्राप्ती झाली आहे.

इतर खनिजांची निर्यात लक्षणीय

याचदरम्यान मसाल्याची निर्यात 19 टक्के वाढली असून इतर खनिजाची निर्यात 174 टक्के वाढले आहे. इतर वस्तूंची निर्यात 10 ते 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. वनस्पती तेल, कृषी रसायन, कागद, पेपर बोर्ड, एसी, फ्रिज मशिनरी, पेंट यांचासुद्धा निर्यातीत समावेश आहे. दूरसंचार उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्यात 2023 मध्ये अनुक्रमे 46 टक्के, 6.75 टक्के वाढली आहे.

Advertisement
Tags :

.