For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दीड टक्के वाढ

06:14 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दीड टक्के वाढ
Advertisement

1 जानेवारी 2025 पासूनचा फरक मिळणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य सरकारने महागाई भत्त्यात 1.50 टक्के वाढ करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल, याप्रमाणे भत्तावाढ लागू करण्यात आली आहे. महागाई भत्तावाढीबद्दल राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Advertisement

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल, याप्रमाणे महागाई भत्त्यात 1.50 टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 10.75 टक्क्यांवरून 12.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी 27 नोव्हेंबर 2024 रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 2.25 टक्के भत्तावाढ करण्यात आली होती. आता पाच महिन्यांनंतर पुन्हा भत्तावाढीचा आदेश देण्यात आला आहे.

28 मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल याप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारने भत्तावाढ केल्यानंतर शक्य तितक्या लवकर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचाही भत्ता वाढवावा, अशा विनंतीचे पत्र सी. एस. षडाक्षरी यांनी सरकारला पाठविले होते. कर्नाटक सरकारने नेमलेल्या के. सुधाकर राव नेतृत्त्वातील राज्य सातव्या वेतन आयोगानेही महागाई भत्ता वाढविण्याच्या बाबतीत असलेल्या नियमाचे पालन करणे योग्य ठरेल, अशी शिफारस सरकारला केली होती. त्यानुसार राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 1.50 टक्के वाढ केली आहे.

भत्तावाढीला मंजुरी दिल्याबद्दल राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि राज्य अर्थखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Advertisement
Tags :

.