महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आप नेत्यांच्या कोठडीत वाढ

06:04 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 

Advertisement

दिल्लीच्या गाजलेल्या मद्यधोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग आणि मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाकडून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना किमान 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे. सिंग यांचा नजीकचा संबंधित सर्वेश मिश्रा याच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

Advertisement

संजय सिंग आणि मनीष सिसोदिया यांना शनिवारी न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले होते. शनिवारी त्यांच्या कोठडीचा शेवटचा दिवस होता. तथापि, आता त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आल्याने त्यांना आणखी किमान पंधरा दिवस तिहार कारागृहातच काढावे लागणार आहेत, असे दिसून येते. याच प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही आरोप असून ईडीने त्यांना चौकशीसाठी तीन वेळा समन्स पाठविले आहे. तथापि, ते एकदाही उपस्थित झालेले नाहीत. दिल्ली सरकारने मद्यसम्राटांना अनुकूल मद्यधोरण हेतुपुरस्सर स्वीकारुन त्यांचा प्रचंड लाभ करुन दिला आणि त्यांच्याकडून पैसा घेतला असा आरोप काही आप नेत्यांवर ठेवण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article