For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर खडीमुळे अपघातांत वाढ

11:15 AM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव वेंगुर्ला मार्गावर खडीमुळे अपघातांत वाढ
Advertisement

वेळेत काम पूर्ण करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्गावरील हिंडलगा ते सुळगा येथील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी टाकण्यात आलेली खडी वाहनचालकांसाठी डोकेदुखी झाली आहे. खडीमधून दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. मागील चार दिवसात अनेक जण दुचाकी घसरून जायबंदी झाल्याने एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. वेंगुर्ला रस्त्यावरील हिंडलगा ते बाचीपर्यंतच्या रस्त्याची पूर्णत: धूळदाण झाली आहे. त्यातच पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहने चालविणेही अवघड झाले होते. सुळगा ते तुरमुरीपर्यंतचा रस्त्याची तर दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे ठिकठिकाणी धुळीचे प्रमाणही वाढले आहे. सुळगा गावानजीक काही ठिकाणी पसरण्यात आली आहे. परंतु, खडी वाहतुकीसाठी तापदायक ठरत आहे. बेळगावहून सावंतवाडी, वेंगुर्ला, चंदगड या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खडीमुळे अडथळा निर्माण होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.