महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रिंटिंगमधील चुकांमुळे चुकीचा क्यूआर कोड डिजीटलवरती; धैर्यशील माने यांच्या कार्यालयाकडून खुलासा

11:29 AM Mar 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
MP Dhyarisheel Mane
Advertisement

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खा. धैर्यशील माने यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून हातकणंगले मतदार संघासाठी एकूण 8,200 कोटी इतका निधी मंजूर करून आणला. मंजूर करून आणलेला निधी व केलेली विकास कामे याची माहिती असलेले डिजिटल बोर्ड संपूर्ण मतदारसंघातील गावोगावी लावण्यात आले होते. त्या सोबतच डिजिटल बोर्डवर एक क्यू आर कोड देण्यात आला. ज्या क्यूआर कोडच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातली प्रत्येक गावासाठी मंजूर केलेला निधी व निधीतून पूर्ण होणारी कामे याची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात आली होती.

Advertisement

पण काही तांत्रिक कारणांमुळे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर मंजूर केलेला निधी व विविध विकास कामे यांची यादी न दिसता, वेगळीच वेबसाईट ओपन होत होती. हा केवळ क्यू आर कोडचा प्रिंटिंग एरर आहे. सध्याच्या डिजिटल युगात केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावी यासाठी आम्ही या माध्यमातून प्रयत्नशील होतो पण एरर असल्याने काही बोर्ड वर लिंक ओपन होऊन शकली नाही.

Advertisement

त्यामुळे आम्ही नवीन कोड प्रसारित करत आहोत. विकास कामांची संपूर्ण माहिती असलेली लिंक आणि क्यूआर कोड या सोबत जोडला आहे. तरी त्याद्वारे शहानिशा करून घ्यावी. अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांचे जनसंपर्क अधिकारी श्री. रणजीत जाधव यांनी दिली.

Advertisement
Tags :
MP Dhyarisheel Manetarun bharat news
Next Article