For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून प्राप्तिकर नियम परिवर्तन

06:36 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजपासून प्राप्तिकर नियम परिवर्तन
Advertisement

करदात्यांचे लक्ष आवश्यक, नवअर्थवर्षाचा प्रारंभ

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आज 1 एप्रिल 2026 पासून नूतन आर्थिक वर्षाचा प्रारंभ होत आहे. आजपासूनच प्राप्तिकर व्यवस्थेच्या अनेक नियमांमध्ये परिवर्तन होत असून ते सर्व करदात्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. नवा प्राप्तिकर कायदा आजपासूनच लागू होणार असून तो 1961 च्या जुन्या कायद्याचे स्थान घेणार आहे. प्राप्तिकराचे नियम, प्रक्रिया आणि व्यवस्थेत मोठे परिवर्तन आजपासून केले जाणार आहे.

Advertisement

प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याच्या समयसीमेत परिवर्तन करण्यात आले आहे. तसेच डेरिव्हेटिव्हज् ट्रेडिंगवरील रोखे व्यवहार करात वाढ होणार आहे. घरभाडे नियमांमध्येही अधिक कठोरता येईल. तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील करांच्या लाभांमध्येही अधिक वाढ होणार आहे. शेअरबाजारासंबंधी नियमही सुधारण्यात आले असून करदात्यांसाठी अधिक सुविधा प्रदान करण्यात आलेल्या आहेत.

करदात्यांचे हित लक्षात घेणार

ही सर्व परिवर्तने 1 फेब्रुवारीला संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहेत. ती 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. ही परिवर्तने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन, तसेच त्यांना जटील प्रक्रियांच्या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी केलेली आहेत, असे प्रतिपादन सरकारने केले. करतज्ञांच्या मतानुसार या सुधारणांमुळे करदात्यांची मोठी सोय केली जाणार आहे.

काय आणि कसे परिवर्तन होणार...

प्राप्तिकर विवरणपत्र सादरीकरण

ड कर्मचारी, सर्वसामान्यांसाठी अंतिम दिवस 31 जुलै 2026

ड स्वयंरोजगार, व्यावसायिकांसाठी अंतिम दिवस 31 ऑगस्ट 2026

ड अॅसेसमेंट वर्ष आणि आर्थिक वर्ष असे दोन प्रकार आता नाहीत

ड या दोन प्रकारांऐवजी आता केवळ एकच ‘करवर्ष’ लागू होणार

डेरिव्हेडिव्हज्वर वाढीव कर

ड डेरिव्हेटिव्हज्वरील सिक्युरिटी व्यवहार करात वाढ होणार

घरभाडे नियम अधिक कठोर

ड काही परिस्थितीत घरमालकाचा पॅनकार्ड क्रमांक आणि अन्य विवरण देणे अनिवार्य होणार

ड जास्त सवलतीच्या शहरांमध्ये बेंगळूर, हैद्राबाद, पुणे, अहमदाबादचा समावेश

कर्मचाऱ्यांच्या करलाभांमध्ये वाढ

ड कर्मचाऱ्यांच्या भोजनभत्यावरील करसवलतीत वाढ

ड करमुक्त भेटवस्तूंच्या किंमत मर्यादेत होणार वाढ

ड जुन्या करव्यवस्थेतील मुलांसाठी भत्ते, शिक्षण वसतिगृह खर्च सवलतीत वाढ

ड रिबेटमध्ये वाढ झाल्याने 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार

ड फॉर्म 16 च्या स्थानी आता फॉर्म 130 (वेतन प्रमाणपत्र) येणार

ड तसेच फॉर्म 16 अ च्या स्थानी आता फॉर्म 131 आणला जाणार

ड मालकाकडून घेतल्या जाणाऱ्या करमुक्त कर्जाची मर्यादा आता 2 लाख

ड कर्मचाऱ्याचा करमुक्त भोजन भत्ता आता 50 रुपयांवरुन 200 रुपये

शेअरबाजार संबंधी नियमांमध्ये परिवर्तन

ड स्टॉक बायबॅकवर अनुमानित लाभांशाच्या स्थानी भांडवली लाभाच्या स्वरुपात कर लागू केला जाणार

ड सॉव्हरीन सुवर्ण रोख्यांच्या मूळ खरेदीच्या रिडप्शनवरच यापुढे करसवलत

ड लाभांश आणि म्युच्युअल फंड प्राप्तीवरील व्याज खर्चाच्या कपातीला अनुमती मिळणार नाही (गुंतवणूक उसनवारी करून केली असली तरी)

करदात्यांच्या प्रक्रियेत सुलभता

ड एकाच घोषणेच्या माध्यमातून अनेक स्रोतांच्या टीडीएसपासून होणार बचाव

ड अनिवासी भारतीयाकडून मालमत्ता खरेदी केल्यास टीडीएस कापण्यासाठी टीएएनची आवश्यकता नाही. पॅनचे माध्यम पुरेसे असेल

ड व्यवसायातील तोटा आठ आर्थिक वर्षांपर्यंत कॅरी फॉरवर्ड करण्याची सवलत

विदेशातील खर्चावर सूट

ड विदेशात केल्या जाणाऱ्या खर्चावरील स्रोत आधारित कर आता 2 टक्के

ड विदेशात शिक्षण किंवा वैद्यकीय उपचारांसाठी पाठविलेल्या पैशावरील टीसीएसमध्ये कपात

केंद्र सरकारकडून महत्त्वाची परिवर्तने

ड करविवरणपत्र सुधारणा कालावधी आता 31 मार्चपर्यंत, मात्र डिसेंबरनंतर सुधारित विवरणपत्र सादर केल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार

ड वाहन अपघात प्रकरणात मिळालेल्या हानीभरपाईवरील व्याजाचे उत्पन्न पूर्णत: करमुक्त करण्यात आले आहे. हा प्रस्ताव अर्थसंकल्पात केला आहे

ड अॅसेसमेंट वर्ष 2026-2027 साठी आयटीआर 1 पासून आयटीआर 7 पर्यंतचे फॉर्मस् उपलब्ध. त्यामुळे करदाते वेळेवर सादर करू शकणार

ड आयटीआर 1 (सहज) मध्ये आता एकाच्या स्थानी दोन घरे दाखविण्याची सोयही करून देण्यात आली आहे. याचा मध्यमवर्गीयांना लाभ होणार

Advertisement
Tags :

.