महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भूपेश बघेल यांच्या उपसचिवांवर प्राप्तिकरचे छापे

07:00 AM Jul 01, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोठय़ा संख्येत सीआरपीएफ जवान तैनात

Advertisement

वृत्तसंस्था /रायपूर

Advertisement

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपसचिव सौम्या चौरसिया यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. 12 हून अधिक अधिकारी गुरुवार सकाळपासून दस्तऐवज पडताळून पाहत आहेत. या कारवाईला अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले. राज्यातील सत्तारुढ पक्षानेही याप्रकरणी मौन बाळगले आहे.

सौम्या चौरसिया यांना मुख्यमंत्री बघेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. त्यांच्या विरोधात अवैध संपत्ती बाळगल्याचा आरोप झाला आहे. प्राप्तिकर विभागाच्या टीमने वेगवेगळय़ा ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे छत्तीसगडमध्ये खळबळ उडाली आहे. याचबरोबर महसमुंदमध्ये दोन अधिवक्त्यांच्या घरी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईसाठी प्राप्तिकर विभागाचे पथक कोलकात्यातून आले होते असे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article