For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिल्पा शेट्टीच्या बेंगळुरातील पबवर प्राप्तिकर छापा

07:00 AM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिल्पा शेट्टीच्या बेंगळुरातील पबवर प्राप्तिकर छापा
Advertisement

बेंगळूर : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या मालकीच्या ऐशोआरामी पबवर बुधवारी पहाटे प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. वेळमर्यादा पाळली जात नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. दरम्यान, बुधवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मालकीच्या बेंगळूरमधील सेंट मार्क्स रोडवरील आलिशान बास्टियन पबवर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी धाड टाकून तपासणी केली. येथील कागदपत्रे, व्यवहाराची बिले, संगणकांमधील तपशिल पडताळण्यात आला.

Advertisement

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून 14 डिसेंबर रोजी बेंगळूरच्या कब्बनपार्क पोलीस स्थानकात पबचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. 11 डिसेंबर रोजी रात्री गस्तीवेळी खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून पबची तपासणी करण्यात आली. मध्यरात्री 1:30 च्या सुमारास तक्रारदाराने पबला भेट दिली असता व्यवस्थापक सरकारने दिलेल्या वेळमर्यादेचे उल्लंघन करून अनधिकृतपणे पब सुरू ठेवत  असल्याचे आढळून आले, असा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी बास्टियन पबवर धाड टाकून झडती घेण्यात आली. राज कुंद्रावर अनेक गुन्हे नोंद असून तपासाचा पुढील भाग म्हणून शिल्पा शेट्टीच्या पबवर छापा टाकण्यात आला असावा, असा तर्कही व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.