For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीला प्राप्तिकर अधिकाऱ्यांची भेट

03:47 PM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीला प्राप्तिकर अधिकाऱ्यांची भेट
Advertisement

बेळगाव : प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अचानक बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीला भेट देऊन तेथील कर संकलन व इतर कामकाजाची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनसंदर्भात ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये जागृती करून पंचायतीला डस्टबीन, झाडू आणि हातमोजे देऊ केले. मंगळवारी सकाळी ग्राम पंचायत नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आली. अचानक प्राप्तिकर विभागाचे साहाय्यक संचालक संजय शंकरराव बोयने आणि धीरज कुमार यांनी ग्राम पंचायतीला भेट दिली. अधिकाऱ्यांनी विशेषत: ग्राम पंचायतीकडून कशा पद्धतीने कर संकलन केला जातो, याची माहिती जाणून घेण्यात आली. संपूर्ण कार्यालयाची पाहणी करून स्वच्छता मोहीम अभियान पंचायतीच्या हद्दीत राबविण्यात यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. त्यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष डॉ. वाय. एम. पाटील यांनी प्राप्तिकर खात्यांच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. उपाध्यक्षा सायराबानू हुक्केरी, सदस्य मगेश चापडे, रमेश कालकार, कल्लाप्पा देसूरकर, कल्लाप्पा एम. पाटील, कल्लाप्पा आर. पाटील यांच्यासह सफाई कर्मचारी व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.