महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयकर खात्याच्या पंकज कुमारला अटक

12:15 PM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाच प्रकरणी सीबीआय गोवाची कारवाई

Advertisement

पणजी : केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) केलेल्या कारवाईत लाच मागितल्याच्या प्रकरणात आयकर खात्याच्या लेखा विभागात सेवा बजावणाऱ्या सीएजी (कंट्रोल ऑफ अकांउंट जनरल) अतुल वाणी याला गुरुवारी अटक केल्यानंतर पुढील कारवाई करताना काल शुक्रवारी पंकज कुमार या आणखी एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. मनुष्यबळ सेवा पुरवणाऱ्या राज एंटरप्राईजेस या कंपनीचे सात महिन्यांचे प्रलंबित बिल देण्यासाठी संशयितांनी 2 लाख ऊपये लाच मागीतली होती. ही लाच न दिल्यास बिलाची रक्कम दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तक्रारदार राज एंटरप्राईजेसचे मालक कमलाकांत चतुर्वेदी यांनी सीबीआय गोवा विभागाकडे या लाचप्रकरणी बुधवारी दि. 13 रोजी लेखी तक्रार नोंदवली होती.

Advertisement

फिर्यादींच्या कंपनीचे सात महिन्यांचे बिल हातावेगळे करण्यासाठी संशयित पंकज कुमार याने 2 लाख ऊपयांची लाच मागितली होती. यापैकी एक लाख ऊपये गुऊवारी देण्याचे ठरले होते. तक्रारी नुसार सीबीआयने गुऊवारी सकाळी 1 लाख ऊपयांची लाच घेताना अतुल वाणी या अधिकाऱ्यला रंगेहात पकडून चौकशी केली असता या प्रकरणात पंकज कुमार या अधिकाऱ्याचा हात असल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक करण्यात आले आहे. संशयितांविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अन्वये गुन्हा नोंदवून सीबीआयने रितसर दोन्ही संशयितांना अटक केली. तसेच सीबीआयच्या पथकाने संशयितांचे कार्यालय तसेच दोघांच्याही घरावर छापा टाकून आवश्यक दस्ताऐवज जप्त केले आहेत. पुढील तपास सीबीआय गोवाचे उपअधीक्षक अर्जुन कुमार मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप हळदणकर करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article