For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

फार्मा कंपन्या, इव्हेंट मॅनेजमेंटवर कंपन्यांवर आयकर खात्याचे छापे

12:08 PM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
फार्मा कंपन्या  इव्हेंट मॅनेजमेंटवर कंपन्यांवर आयकर खात्याचे छापे

वेर्णा, करासवाडा, दिवाडी, दोनापावला, करंझाळे, पर्वरी, पणजी भागात कारवाई

Advertisement

पणजी : आयकर बुडविल्याप्रकरणी आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील फार्मास्युटिकल तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर छापे मारुन गेल्या तीन-चार दिवसात करोडो ऊपये जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. वेर्णा व करासवाडा औद्योगिक वसाहतींमधील तीन फार्मा कंपन्यांची झडती घेण्यात आली. यातील एका फार्मास्युटिकल कारखान्यात कोविड चाचणीसाठी किट बनवण्यात येते. देशी व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या किटचा पुरवठा केला जातो. म्हापसा येथील अन्य एक फार्मा उद्योग औषधे बनवून देश विदेशात विकतो. त्याचीही झडती घेण्यात आली.

बोगस बिलांद्वारे बुडविला कर

Advertisement

आयकर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात असे आढळून आले आहे की, खरे उत्पन्न लपवण्यासाठी यापैकी काही कंपन्यांनी बोगस बिले वापरली आहेत. आठ वेगवेगळ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची व दोन हॉटेल उद्योग समूहांचीही झडती घेण्यात आली आहे. या कंपन्या बडे विवाह समारंभ आयोजित करत होत्या. मात्र या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर बुडवल्याचे आढळून आले आहे.

Advertisement

इव्हेंट कंपन्यांवर छापे

दिवाडी, दोनापावला, करंझाळे, पर्वरी, पाटो व मळा येथील इव्हेंट कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. दरम्यान, गोवा राज्य फार्माहब म्हणून ओळखले जाते. देशभरात उत्पादन होणाऱ्या औषधांपैकी 12 टक्के औषधे गोव्यात उत्पादित होतात. त्यातील 70 टक्के निर्यात केली जातात, अशी अधिकृत आकडेवारी आहे. गोव्यात अनेक फार्मा कंपन्या कार्यरत आहेत. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या अंदाजे 80 फार्मास्युटिकल युनिट्समधून दरवर्षी सुमारे 14 हजार कोटींची उलाढाल केली जाते. दरवर्षी सुमारे 11 हजार कोटींच्या औषधांची निर्यात केली जाते आणि अन्य उत्पादने भारतात विकली जातात, अशीही अधिकृत माहिती आहे.

Advertisement
Tags :
×

.