कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Income Tax Raid : कोल्हापुरातील प्रतिष्ठित स्टील व्यावसायिकावर आयकर विभागाची धाड !

12:29 PM Oct 09, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                       या धाडीतून बेहिशोबी मालमता उघडकीस येण्याची शक्यता

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका मोठ्या व प्रतिष्ठित स्टील व्यावसायिकावर बुधवारी आयकर विभागाने धाड टाकली आहे. या धाडीतून बेहिशोबी मालमता उघडकीस येण्याची शक्यता आहे. या स्टील व्यावसायिकाची स्टील फॅक्टरी कोल्हापुरातील गोकुळ शिरगांवसह गोवा येथे आहेया व्यावसायिकाच्या रमणमळा येथील निवासस्थानावर ही धाड टाकण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

हा स्टील व्यावसायिक परप्रांतीय असून गेल्या कांही वर्षांपासून कोल्हापुरात स्थायिक झाला आहे. कोल्हापूर, गोव्यामध्ये त्याची फॅक्टरी असून त्याची विक्री मोठ्या शहरामध्ये होत आहे.

त्याचा वाषिक उलाढाल ५०० कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. त्यातील कांही कागदपत्रे संशयास्पद असल्याने आयकर विभागाने बुधवारी त्याच्यावर घाड टाकली. त्याच्याकडील कागदपत्रांच्या तपासणीमधूनच किती आयकर चुकवला आहे, बेनामी संपती मिळवली आहे काय ? हे लवकरच या घाडीतून स्पष्ट होणार आहे.

या स्टील व्यावसायिकाकडून शहरातील अनेक बांधकाम व्यावसायायिकांना स्टीलचा पुवठा केला जातो. त्या बांधकाम व्यावसायिकांचीही चौकशी आयकर विभागाकडून होणार आहे. या घाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी सहभागी झाले आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaincom taxkolhapurkolhapur income tax raidkolhapur newsmaharastra newstax raid
Next Article