महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीत कोडोली मंडलचा समावेश

05:23 PM Nov 11, 2023 IST | Abhijeet Khandekar
Kodoli Mandal
Advertisement

वारणानगर / प्रतिनिधी

राज्यात ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडल मध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून यामध्ये पन्हाळा तालुक्यातील कोडोली मंडलचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज या दोन तालुक्यासह दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यां व्यतिरिक्त १०२१ महसूली मंडल मध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमिती च्या ९ नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे तसा शासन निर्णय महसूल व वन विभागाने निर्गमित केला आहे.

Advertisement

राज्यातील उर्वरीत तालुक्यातील महसुली मंडलमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पेक्षा आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकष लक्षात घेऊन १०२१ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती १०२१ महसुली मंडलामध्ये लागू करण्यात येणार आहेत. दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत, असे शासन निर्णयात नमूद आहे.

Advertisement
Tags :
Kodoli MandalKodoli Mandal drought-liketarun bharat news
Next Article