महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘इन्फोसिस’चा जगातील मौल्यवान ब्रँडमध्ये समावेश

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगभरातील पहिल्या 100 ब्रँडमध्ये स्थान : सलग तिसऱ्या वर्षी केली कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे नाव कमावणारी इन्फोसिस आता जगातही आपला झेंडा फडकवत आहे. कंपनीने 12 जून रोजी सांगितले की सलग तिसऱ्या वर्षी जगातील 100 सर्वात मौल्यवान ब्रँडमध्ये इन्फोसिसने स्थान मिळवले आहे. मार्केटिंग डेटा आणि अॅनालिटिक्स व्यवसायातील आघाडीच्या कांतरने ही माहिती दिली आहे. इन्फोसिस जगातील 100 सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये 74 व्या क्रमांकावर आहे आणि सर्वात मौल्यवान जागतिक बी2 बी (व्यवसाय-ते-व्यवसाय) तंत्रज्ञान ब्रँड म्हणून कंपनी 20 व्या स्थानावर आहे.

इन्फोसिसचे वैशिष्ट्या..

एंटरप्राइज आर्टिफिशियल इंटेलिजेंस सारख्या डोमेनमध्ये इन्फोसिसची चांगली पकड आहे आणि यामुळेच ती टॉप 100 मध्ये स्थान मिळवू शकली आहे. यात जनरेटिव्ह एआय आणि क्लाउड सारख्या क्षमतांचाही समावेश आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंपनीने या क्षेत्रात खूप पूर्वी गुंतवणूक केली होती आणि आता तिला त्याचा उत्तम लाभ मिळू लागला आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे

काय म्हणाले विरमानी

इन्फोसिसचे मुख्य विपणन अधिकारी सुमित विरमानी यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर भूराजकीय अस्थिरता असूनही कंपनीने आपली कामगिरी उठावदारपणे केली आहे. यासोबत आपल्या ग्राहकांनाही उत्तम सेवा दिली आहे. विरमानी यांनी प्रकाशनात म्हटले आहे की, ‘अनिश्चितता असूनही, आमच्या ग्राहकांनी अत्याधुनिक डिजिटल-फर्स्ट, क्लाउड-फर्स्ट आणि एआय-फर्स्ट दृष्टिकोनासह त्यांचे पुढील लक्ष्य साध्य करण्यात मदत करण्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवला. आगामी काळातही आवश्यक मनुष्यबळाची गरज लागल्यास ती भरुन काढली जाईल. प्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदाल हे या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसडर आहेत. कंपनीने आपल्या मार्केटिंगद्वारे स्वत:ला एक ब्रँड बनवले आहे. टेनिस आयकॉन इगा स्विटेकही ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article