For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूलाचे काम सुरु असताना डंपरची धडक

11:34 AM Feb 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पूलाचे काम सुरु असताना डंपरची धडक
Advertisement

इन्सुली कोठावळे बांध येथील घटना ; इन्सुली जि. प. सदस्य नितीन राऊळ आक्रमक

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

इन्सुली कोनवाडा ते माडभाकर कोठावळे बांध रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहे. परंतु रात्री अचानक इन्सुली येथील डांबर प्लांट वरून जाणाऱ्या डंपरने अचानक तिथे बांधकाम सुरू असलेल्या पुलाला धडक दिली. सुदैवाने काही नुकसान झाले नाही. पण, लोकांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ त्याची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी पाहणी करून आक्रमक पवित्रा घेत भविष्यात या ठिकाणी पुलाला जर धोका निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कॉन्ट्रॅक्टरची राहील त्यामुळे सदर काम चांगल्या पद्धतीने आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन काम करायचे अशा सूचना जिल्हा परिषद सदस्यांनी ठेकेदार यांनी दिले आहेत.यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता भोसले यांच्याशी संपर्क साधून सदर रस्त्याची पाहणी करून त्या ठिकाणी रस्ता वाहतुकीस पूर्णपणे सुरक्षित करा ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावा, शाळकरी विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात त्यामुळे बाजूलाच मोठी विहीर असल्याकारणाने त्यावेळी डंपर ने धडक दिली सदर डांबर प्लांटचे मालक रोहित नाडकर्णी यांना विचारणा केली असता डंपर चालकाला दोन दिवसापूर्वी कामावरून काढून टाकण्यात आल आहे असं सांगण्यात आलं मग रात्री असा अचानक तो डंपर घेऊन कसा काय गेला त्या ठिकाणी जर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण होता असा प्रश्नही नितीन राऊळ यांनी उपस्थित केला. क्रेनच्या साह्याने डंपर बाजूला करण्यात आला व रस्ता मोकळा केला यावेळी ग्रामस्थ प्रदीप कोठावळे, ठेकेदार महेश धुरी, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, प्रशांत वारंग, रामचंद्र कोठावळे, पिंट्या नाईक, शिर्के भाऊ, भिवा मुळीक, आप्पा आमडोसकर, अनंत वारंग, सुजय कोठावळे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Advertisement
Advertisement
Tags :

.