महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘वुमन फिटनेस जिम’चे टिळकवाडी येथे उद्घाटन

10:28 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये टिळकवाडी मराठा कॉलनी येथे राज के.पुरोहित संचालित महिलांसाठीच्या ‘वुमन फिटनेस जिम’चे उद्घाटन शुक्रवारी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या जिममध्ये महिला प्रशिक्षकच महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. मुख्य म्हणजे महिलांच्या सोयीच्यादृष्टीने सकाळी 6 ते सायंकाळी 7 ही जिमची वेळ ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते फीत कापून जिमचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी ‘बॉडी अॅनॅलिसीस’ मशीनसह जिमसाठीची सर्व अत्याधुनिक अशी उपकरणे तैवानहून मागविण्यात आली आहेत. तसेच फिटनेस व डाएट याबद्दल मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. महिलांसाठी झुंबा व योगावर्ग सुरू करण्यात येणार असून, आरोग्य व आहाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच स्वसंरक्षणाचे धडे विनामूल्य देण्यात येणार आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिमच्या आधुनिकतेबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व महिलांनी सक्षम राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज के. पुरोहित व कमल पुरोहित यांनी त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. अक्षता, अनुषा व केशवलाल पुरोहित यांनी सर्वांचे स्वागत केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article