कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आचरा बीचवर पर्यटकांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्थेचे लोकार्पण

12:53 PM May 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली व्यवस्था

Advertisement

आचरा प्रतिनिधी
आचरा समुद्र किनाऱ्यावर सातत्याने वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पर्यटकांची सोय व्हावी म्हणून आचरा ग्रामपंचायत मार्फत आचरा समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बॅंचची व्यवस्था करण्यात आली. बैठक व्यवस्थेचे लोकार्पण आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांच्या हस्ते करण्यात आले. ही बैठक व्यवस्था व्हावी म्हणून ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर उर्फ चावल मुजावर यांनी विशेष मेहनत घेतली.पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आचरा समुद्र किनारी बैठक व्यवस्था व्हावी अशी मागणी सातत्याने होत होती. ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न करत सुसज्ज अशी बैठक व्यवस्था ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून घेतली आहे. या लोकार्पण प्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, माजी सरपंच डॉ. प्रमोद कोळंबकर, अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर, पवन पराडकर, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, तन्वी जोशी,मुरली कोळंबकर, प्रफुल्ल भाबल, अजित घाडी, सतीश खवणेकर, राजा मुळेकर, मोहन परब, आनंद तारी, अजय कोंयडे, दर्शन तारी, नितीन तारी, श्रीकांत पराडकर, भगवान कोळंबकर, सर्वेश तोडणकर, रत्नकांत सारंग, अब्दुल मुजावर, सालवादर मिरांडा, सुदेश सारंग, बंड्या पराडकर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article