For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ले तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

11:27 AM Dec 10, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ले तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
Advertisement

६१ प्रतिकृतींचा सहभाग

Advertisement

वेंगुर्ले : प्रतिनिधी

रा. कृ. पाटकर हायस्कुल व रा. सी. रेगे ज्युनिअर कॉलेज वेंगुर्ले येथे तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वेंगुर्ले तालुका गटविकास अधिकारी तथा प्रशासक वासुदेव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पाटकर, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. वैभव शिंदे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच केंद्रप्रमुख आव्हाड, तुळसकर, अडुळकर, शिक्षण विस्तार अधिकारी कोनकर, वेंगुर्ले विज्ञान मंडळ अध्यक्ष चव्हाण, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी गोसावी यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात 43 तर माध्यमिक गटात 18 प्रतिकृतींचा सहभाग होता. शिवाय शिक्षक प्रतिकृती माध्यमिक व प्राथमिक गटातून सादर झाल्या. तसेच विज्ञान विषयक निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा ही झाल्या. स्वागत मुख्याध्यापक धुरी यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा खरात यांनी केले. तर आभार विलास गोसावी यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.