For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नांदोस , कट्टा गुरामवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

04:00 PM Dec 29, 2023 IST | अनुजा कुडतरकर
नांदोस   कट्टा गुरामवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
Advertisement

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

Advertisement

कट्टा /वार्ताहर

मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत नांदोस कार्यक्षेत्रातील मौजे नांदोस खोत दुकान ते नांदोस बांधवाडी येथे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामास आमदार स्थानिक विकास निधी 2023-24 अंतर्गत 6 लाख रुपये निधी आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून देण्यात आला. तसेच बजेट 2021-22 योजनेअंतर्गत नांदोस कट्टा जोडरस्ता कट्टा समादेवी मंदिर ते ग्रामपंचायत नांदोस कार्यालय ग्रामा 338 रस्ता 0/00 ते 1/00 मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 9.50 लाख व बजेट 2021-22 योजनेअंतर्गत कट्टा एस. टी. स्टँड ते गुरामवाड रस्ता ग्रा मा 380 कि मी 0/00 ते 1/800 मध्ये डांबरीकरण व मजबूतीकरण करणे या कामास 19 लाख रुपये आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आले. या विकास कामांचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच, ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी पराग नार्वेकर, राजू गावडे, अशोक नांदोसकर, कमलाकर गावडे आरती नांदोसकर, वंदेश ढोलम दर्शन म्हाडगुत हेमंत माळकर ,संदीप ढोलम ,बाळ महाभोज, यशवंत भोजने ,भास्कर आकेरकर, अण्णा मोरजकर ,रवी गुराम, हर्षद मोरजकर ,समीर माळवदे, अरुण पावसकर, श्वेता सावंत, देविदास रेवडेकर, संतोष नागवेकर, निलेश हडकर, भाऊ चव्हाण, सोमनाथ माळकर, प्रसाद रेवडेकर, मधू वाईरकर ,शैलेश बिबवणेकर ,गणेश पारकर ,सुभाष गावडे, मिलिंद जामसंडेकर,जगदीश मोरजकर, व अन्य ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व विकास कामांबाबत ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले या कार्यक्रमादरम्यान आमदार वैभव नाईक यांनी नांदोस येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या नांदोस दूध उत्पादक सहकारी संस्था या संस्थेला भेट देऊन दूध संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला व त्यावेळी या नवीन दूध संकलन संस्थेला नवीन प्रिंटर मशीन देण्याचे व इतर कोणतेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष संचालक यांनी पुष्गुच्छ देऊन आ. वैभव नाईक यांचे स्वागत केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.