For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धेश्वरनगर काकती येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

10:30 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धेश्वरनगर काकती येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
Advertisement

स्मार्टसिटी योजनेंतर्गत 1 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर

Advertisement

वार्ताहर /काकती

सिद्धेश्वरनगर काकती येथील स्मार्टसिटी योजनेतंर्गत 1 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. सिद्धेश्वर नगरातील नागरिक व महिलांनी अनेक दिवसांपासून पायाभूत सुविधांची मागणी केली होती. यांची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री जारकीहोळी यांनी सिमेंट काँक्रीटचा रस्ता, गटारी व सुशोभित रस्त्यातील प्रकाश दिवे व खांब यासाठी 1 कोटी 30 लाख रुपये तर सिद्धेश्वर नगरात नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. परंतु बंधाऱ्याचे पाणी अशुद्ध असल्याने पिण्यालायक नव्हते. परिणामी जुन्या गावातील शुद्ध पिण्याचे पाणी आणण्यासाठी ओढाताण करावी लागत होती. ही समस्या सार्वजनिक कार्यकर्ते महेश दंडगी, नागेश पाटील, नारायण अष्टेकर आदींसह महिलांनी समस्या मांडली होती. नागरिक व महिलांच्या लक्षवेधी समस्येची सूचना लक्षात घेऊन दोन शुद्ध पेयजल प्रकल्प व बसस्टॅन्ड उभारण्यासाठी 40 लाखाचा निधी तातडीने मंत्री जारकीहोळी यांनी मंजूर करून कामाचा शुभारंभ केला आहे. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते नागेश पाटील यांनी या नगरातील रहिवाशांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, ग्रा. पं. उपाध्यक्षा रेणुका कोळी, युवा नेते राहुल जारकीहोळी, जि. पं. माजी सदस्य सिद्दगौडा सुणगार, ता. पं. माजी सदस्य यल्लाप्पा कोळेकर, ग्रा. पं. माजी अध्यक्ष सुनिल सुणगार, अनिल देशपांडेसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन सुजाता पै यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.