कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विश्वविक्रमी रांगोळीचे लोकार्पण

04:39 PM Mar 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

शिराळा :

Advertisement

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने शिराळा भुईकोट किल्ला येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची विश्वविक्रमी रांगोळीचा लोकार्पण सोहळा पार पडला. निनाईदेवी शिक्षण संस्थेच्या अॅड. रेणुकादेवी देशमुख, ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख, भाजपा मंडल अध्यक्ष हणमंतराव पाटील, सुखदेव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, युवा नेते रणजितसिंह नाईक, जिल्हा भाजप सरचिटणीस सम्राट महाडिक उपस्थित होते.

Advertisement

यावेळी रेणुकादेवी देशमुख म्हणाल्या, शिराळा येथील भुईकोट किल्लास ऐतिहासिक महत्व आहे. याच ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला. या ठिकाणी संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून मार्गी लागेल. शिराळासह व शिराळा पंचक्रोशितील हजारो मावळ्यांची व जनतेची ही मागणी पूर्ण होईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची गौरवशाली माहिती याठिकाणी लावली आहे. ही रांगोळी ऐतिहासिक व विश्वविक्रमी ठरेल. शिराळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर भव्य दिव्य रांगोळी रेखाटली आहे. ही रांगोळी विश्वविक्रमी रांगोळी ठरेल. निनाईदेवी शिक्षण संस्थेच्या सचिवा अॅड रेणुकादेवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात येत आहे. ही रांगोळी डोंगरी भागात राहणारा, शिराळ्याचा भूमिपुत्र, अयोध्या प्रसिद्ध रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांनी रेखाटली आहे. मंगळवार ११ मार्च ते १६ मार्चपर्यंत रांगोळी पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

यावेळी शिराळा शहर भाजपा अध्यक्ष कुलदीप निकम, पी. जी. शिंदे, बसवेशर शेटे, शुभम देशमुख, प्रशांत कुंभार, संतोष इंगवले, अशोक गायकवाड, प्रदीप पाटील, महादेव गायकवाड, विनोद पाटील, मोहन जरांगे, अभिजित यादव, अमोल काळे, रणजित कदम, शाहु निकम आदी उपस्थित होते

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article