For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देसुरात संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

10:27 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
देसुरात संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
Advertisement

गावात उत्साही वातावरण : कलश मिरवणूकही : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजींची उपस्थिती 

Advertisement

वार्ताहर /धामणे

देसूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पंचधातू पुतळ्याचा दुग्धाभिषेक व लोकार्पण सोहळा रविवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्या सानिध्यात उत्साही वातावरणात झाला. सोहळ्याची सुरुवात सकाळी येथील छत्रपती श्री शिवाजी सर्कलातील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून केले. त्यानंतर गावात सुवासिनींनी डोक्यावर  कलश घेऊन भव्य सवाद्य मिरवणूक काढली. मिरवणुकीद्वारे गावातील सर्व मंदिराचे दर्शन घेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या मिरवणुकीचे आगमन झाले. त्यानंतर विधिवत पूजन सतिश काळसेकर दाम्पत्यांच्या हस्ते झाले.

Advertisement

नामफलकाचे अनावरण

त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजींच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात येऊन मूर्तीचे पूजन कण्यात आले. भगव्या ध्वजाचे पूजन हणमंत चव्हाण व गंगाराम मजूकर यांच्या हस्ते करून ध्वज फडकविण्यात आला. त्याचप्रमाणे स्मारक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य रमेश गोरल व माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना संभाजी भिडे गुरूजी म्हणाले, अफाट मोंगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज उत्तम साहित्यिक व संस्कृत भाषेचे उत्तम जानकारीही होते. सर्वांनी धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार आचरणात आणून धर्म आणि देशासाठा झटावे असे सांगितले. कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, बेळगाव जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जोतिबा काळसेकर, ग्राम पंचायत सदस्य सतीश चव्हाण, संकेत पाटील, दाजीबा गावकर, जोतिबा अनंत काळसेकर, रमेश पाटील, सुनील बोकडे, हिरामनी मुंचडीकर तसेच महिला, गावातील सर्व थरातील नागरिक, वारकरी मंडळी आणि देसूर येथील शिवप्रतिष्ठानचे धारकरी त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भुजंग चव्हाण यांनी केले.

Advertisement
Tags :

.