For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सफाई कर्मचारी हितरक्षण समितीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

06:22 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
सफाई कर्मचारी हितरक्षण समितीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
Advertisement

त. भा. प्रतिनिधी /बेळगाव

Advertisement

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून न्यायालय परिसरातील सिटी सेंट्रल लायब्ररीच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीत सफाई कर्मचारी हितरक्षण समितीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे सफाई कामगार संघटनेला अनेक वर्षांनंतर हक्काचे कार्यालय मिळाले आहे.

कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, सफाई कामगारांचे प्रश्न केवळ रोजगारापुरते मर्यादित नसून त्यांच्या कुटुंबाचे शिक्षण, निवास, सामाजिक सुरक्षा, पुनर्वसन आणि मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या या कार्यालयाचा सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयोग करावा, असे ते म्हणाले.

Advertisement

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग निर्मूलन, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना घरांचे हक्कपत्र, निवासी समस्या, पुनर्वसन, निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी हे मुद्दे आहेत. सदर कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष दीपक वाघेला, सरचिटणीस विजय निरगट्टी, मानद अध्यक्ष मुनीस्वामी भंडारी, खजिनदार षन्मुख आदियांद्र यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.