भोगापुरम येथे विमानतळाचे उद्घाटन
आंध्र प्रदेशात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम
वृत्तसंस्था
अमरावती
आंध्र प्रदेश राज्याच्या उत्तर भागात असलेल्या विजयनगरम या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भोगापुरम येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या विमानतळाचे नामकरण अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमातनळ असे करण्यात आले. या प्रकल्पासाठी 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यामुळे उत्तर आंध्र प्रदेशच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्र सरकारकडून केले गेले.
या शानदार उद्घाटन कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राममोहन नायडू, तसेच इतर अनेक मान्यवराची उपस्थिती होती. भोगापुरम येथील हा विमानतळ प्रसिद्ध जीएमआर उद्योगसमूहाने विकसीत केला आहे. त्याचे नामकरण आंध्र प्रदेशचे महान स्वातंत्र्य संघर्ष नेते अल्लुरी सीतारामन राजू यांच्या सन्मानार्थ करण्यात आले आहे. हा विमानतळ त्याच्या या प्रथम टप्प्यात प्रतिवर्ष 60 लाख प्रवासी हाताळणार आहे. भविष्यकाळात या विमानतळाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असून ती चार कोटी प्रवासी प्रतिवर्ष पर्यंत नेण्यात येणार आहे. या विमानतळावरुन प्रथम व्यापारी उ•ाण 17 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.
कनेक्टिव्हिटीत वाढ होणार
उत्तर आंध्र प्रदेशची जागतिक कनेक्ट़िव्हिटी या प्रकल्पामुळे वाढणार आहे. तसेच या भागात नव्या उद्योगांची स्थापना, रोजगार निर्मिती, उत्पादन वाढ, पर्यटन आणि धार्मिक पर्यटन आदी सर्व आर्थिक विषयांना या विमातनळामुळे चालना मिळणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमानांही यामुळे बळ मिळेल, अशी माहिती केंद्र सरकार आणि राज्यसरकारांनी दिली आहे.
भव्य स्वागत
विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भोगापुरम येथे भव्य स्वागत करण्यात आले. येथील वनवासींनी त्यांच्या पांरपरिक वेषभूषेत आणि पारंपरिक नृत्य-गायनाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या भागातील ‘धीमसा’ या पुरातन नृत्यप्रकारचे दर्शन पंतप्रधान नरेंद मोदी यांना घडविण्यात आले. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशसाठी 17 हजार 900 कोटी रुपयांच्या योजनांची घोषणाही केली. त्यांच्यापैकी अनेक योजनांचा त्यांनी शीलान्यास केला. तर पूर्ण झालेल्या योजनांचे राष्ट्रार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशची पारंपरिक शाल भेट देऊन सत्कार केला. हे सर्व प्रकल्प आंध्र प्रदेशचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यात मोठे योगदान देतील असा विश्वास दोघांनीही व्यक्त केला आहे. अनेक योजनांचा शुभारंभ
ड पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशसाठी 17,900 कोटींच्या योजना
ड भोगापुरम येथील विमानतळाचा भविष्यात आत्तापेक्षा चौपट विस्तार होणार
ड उत्तर आंध्र प्रदेशचा विकास घडवून आणण्यासाठी हे प्रकल्पांकडून योगदान
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पारंपरीक पद्धतीने वनवासींकडून भव्य स्वागत