कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वारणेत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

12:52 PM Dec 10, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

Advertisement

शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान अवगत करुन शेतीत वेगवेगळे प्रयोग करून उत्पादकता वाढवावी असे आवाहन वारणा समूहाचे प्रमुख आ.डॉ.विनय कोरे यांनी केले.वारणानगर ता. पन्हाळा येथील वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २९ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री तात्यासाहेब कोरे वारणा सह साखर कारखाना, वारणा विभाग शेतीपूरक व शेती प्रशिक्षण संस्था आणि लघू,सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या संयोजनातून दि.९ ते १३ डिसेंबर या कालावधीत आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे
शानदार उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते आज शनिवारी सायंकाळी झाले. या प्रदर्शनात २०० हून अधिक विविध स्टॉल सहभागी झाले आहेत.

Advertisement

या प्रसंगी वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव, समन्वयक प्रा जीवनकुमार शिंदे,शेतीपूरक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, व्यवस्थापक आर बी कुंभार, जिल्हा परिषदेचे अधिकारी सचिन पानारी,इव्हेंट मॅनेजमेंटचे रूपेश कोळेकर यांच्यासह वारणा उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक,अधिकारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Advertisement
Tags :
#waranaagricultural exhibitionVinaykore
Next Article