दक्षिण विभागीय सीबीएसई स्केटिंग स्पर्धेचा शुभारंभ
बेळगाव : बेळगाव येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल आयोजित दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेला प्रारंभ झाला. ओमनगर येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लब व रोड रेस आदर्श स्कूल रोड रिंक रेस ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ बेळगांव येथे करण्यात आले आहे. गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व देशभक्ती वर गीताने या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. मॅनेजिंग डारेक्टर गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल प्रेरणा घाटगे, यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले,
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिक प्रचिती आंबेकर, कर्नाटका रोलर स्केटिंग संघटनेच्या सेक्रेटरी इंदुधर सीताराम , उमेश कलघटगी, ज्योती चिंडक, सीबीएसई निरीक्षक एच आर रविश, आशा इंदूधर, मुख्य पंच स्मृती जयकुमार, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळ्ळुकर, इम्रान बेपारी, बेळगाव मधील इतर मान्यवर व शाळेचा स्टाफ या कार्यक्रमाला उपस्थित होते. केरळ, महाराष्ट्र, गोवा, दिवदमण, कर्नाटक येथून सुमारे 2000 हुन अीधक अव्वल स्केटर्स सहभागी होणार असून या स्पर्धासाठी 1 सीबीएसई निरीक्षक भारतीय रोलर महासंघटना यांच्या वतीने 18 ऑफिशियल, बेलगाम जिल्हारोलर स्केटिंग संघटना यांच्यावतीने 20 ऑफिशीयल व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलचे 45 शिक्षक हे सर्वजण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.