सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठानच्या फिरत्या दवाखान्याचे सावंतवाडीत उद्घाटन
पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि मंत्री केसरकरांची उपस्थिती
सावंतवाडी । प्रतिनिधी
योगविद्या प्राणिक हीलींग फाउंडेशन ऑफ साउथ मुंबई व सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी संचलित ग्रँडमास्टर चाओ काँक् सुई फिरते वैद्यकीय पथक लोकार्पण सोहळा शुक्रवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सावंतवाडी राजवाडा येथे झाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले ,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , सिंधूमित्र सेवा सहयोगचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ठाकरे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष लवु म्हाडेश्वर , शोभा धामापुरकर, फिरत्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख दीपक गावकर, अँड फर्नांडिस ,माजी नगरसेवक उदय नाईक, प्रमोद गावडे प्रमोद सावंत, रेलिंग फाउंडेशनचे विवेक दोषी ,गुरुप्रसाद राऊळ ,संजय लाड आदी उपस्थित होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांचे कौतुक केले. या भागात ते आरोग्य विषयक उपक्रम राबवत आहेत. फिरत्या दवाखान्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सेवा त्यांच्या गावात उपलब्ध होणार आहेत. ठाकरे हे स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यामुळे त्यांच्या अंगात सामाजिक बांधिलकी भिनलेली आहे. शासकीय महाविद्यालय ओरोस येथे होण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. परंतु , मधल्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे काम थांबले होते . परंतु, आमचे सरकार पुन्हा आल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती मिळाली. हे काम माझ्या हातूनच व्हायचे होते. वैद्यकीय महाविद्यालय पूर्णत्वास आले. आता आरोग्य पर्यटनाची गरज असल्याचे ते म्हणाले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधू सेवा सहयोग प्रतिष्ठानचे कौतुक केले. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जमिनीचा प्रश्न आजच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर राहुल गवाणकर यांनी केले.