मांडवी किनारी ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’चे उद्घाटन
रत्नागिरी :
पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’च्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील मांडवी किनाऱ्यावर भाजप कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वखर्चातून सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिट बांधण्यात आले आहे. या युनिटचे उद्घाटन रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी केले.
कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेतंर्गत रत्नागिरीच्या समुद्रकिनारी 6 ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट बांधण्यात येणार आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’ विथ ‘बायो डायजेस्टर’चे 9 युनिट आणि चेजिंग ऊमच्या एकूण 9 युनिटसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी 5 कोटीचा निधी उपलब्ध कऊन दिला आहे. त्यातून ही सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिटची सुविधा उपलब्ध झाली आहे. येथे पाच रुपयांत ही सुविधा पर्यटकांना घेता येणार आहे. मांडवी येथे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिटचा शुभारंभ भाजप कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपच्या महिला मोर्चाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे, कार्यकारिणी सचिव परशुराम ढेकणे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, अशोक मयेकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी, पल्लवी पाटील, सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.