For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीयू हॉकी स्पर्धांचे उद्घाटन

10:06 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
आरसीयू हॉकी स्पर्धांचे उद्घाटन
Advertisement

बेळगाव : येथील एसकेई संस्थेच्या आरपीडी कॉलेजमध्ये राणी चन्नमा विद्यापीठ बेळगावच्या पुरूष आणि महिला हॉकी स्पर्धांचे उद्घाटन संस्थेच्या पटवर्धन क्रीडांगणावर आज सकाळी करण्यात आले. सकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. व्यासपीठावर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे आरसीयुचे क्रीडा निर्देशक डॉ. जगदीश घस्ती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसकेई स्पोर्टस अॅकॅडमीचे चेअरमन आनंद सराफ उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून जीएसएस कॉलेजचे निवृत्त क्रीडा प्रशिक्षक एम. जे. तेरणीकर उपस्थित होते. व्यासपीठावर आरपीडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अभय पाटील, कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिलचे व्हा. प्रेसिडेंट डॉ. एस. एच. पाटील, हिंदी विभाग प्रमुगा प्रा. विजयकुमार पाटील, आरपीडी कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक डॉ. रामकृष्ण एन. आरपीडी पीयुचे क्रीडा प्रशिक्षक आनंद रत्नापगोळ, जीएसएस कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक प्रशांत मंकळी, पीयु कॉलेजचे विनय नाईक, लिंगराज कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक डॉ. सी. रामराव, हॉकी निवडकर्ते म्हैसुर विद्यापीठाचे अरूण व विविध कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते.

Advertisement

यावेळी डॉ. जगदीश घस्ती, आनंद सराफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. यावेळी डॉ. जगदीश घस्ती, आनंद सराफ, प्राचार्य डॉ. अभय पाटील यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर समयोचित भाषणे झाली. बागलकोट, बेळगाव, चिकोडी, विजयपूर येथील पुरूष सात व महिला सहा टीमनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. रामकृष्ण एन., प्रा. पुजा पाटील, हेमा अनगोळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. धवलश्री सरदेसाई, क्रीडा सेक्रेटरी अनुष्का शंकरगौडा, टीना वानखेडे यांनी केले. आभार क्रीडा सेक्रेटरी अनुष्का शंकरगौडा हिने मानले. दोन दिवस या हॉकी स्पर्धा चालणार असून या खेळाडूतून हॉकीपटू खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.