पायोनियर बँकेच्या नूतन शाखेचे हिंडलगा येथे उद्घाटन
वार्ताहर /हिंडलगा
पायोनियर अर्बन बँकेने अनेक व्यावसायिकांना स्वावलंबी उद्योजक होण्यासाठी मोठे साहाय्य केले आहे. ग्रामीण 2000 महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी केलेले कार्य अभिमानास्पद असून सभासदांशी स्नेहाचे नाते जोडल्याने ही बँक जनतेच्या आदरास पात्र ठरली आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. त्यांनी हिंडलगा येथे अर्बन बँकेच्या पाचव्या शाखेचे फीत सोडून उद्घाटन केले. त्या म्हणाल्या, ग्रामीण महिलांची प्रगती करण्यात बँक यशस्वी ठरेल, असा मला विश्वास वाटतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रदीप अष्टेकर, प्रमुख अतिथी माजी आमदार रमेश कुडची, व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण-पाटील, ए-ग्रेड कॉन्ट्रॅक्टर एन. एस. चौगुले, ता. पं. माजी सदस्य एस. एल. चौगुले, गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजी अतवाडकर व बँकेच्या सी.ई.ओ. व्यासपीठावर होत्या.
प्रास्ताविक रणजीत चव्हाण-पाटील यांनी केले. स्वागत प्रदीप अष्टेकर यांनी करून बँकेने गेल्या काही वर्षात 84 कोटीवरून उल्लेखनीय प्रगती करत 156 कोटी ठेवीची घोडदौड ही जनतेचा आमच्यावर विश्वास असल्यामुळे शक्य झाली आहे. आता दोनशे कोटीच्या ठेवींचा टप्पा गाठण्याचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन, लक्ष्मी प्रतिमा पूजन एन. एस. चौगुले तर स्ट्रॉंगरूम व संगणकाचे उद्घाटन शिवाजी अतवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सीईओ अनिता मूल्या, व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन अनंत लाड उपस्थित होते.
जागा मालक व निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांचा स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला हिंडलगा पंचक्रोशीतील ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद व सहकारी संस्थांचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच उद्योजक उपस्थित होते. याप्रसंगी सह्याद्रीचे चेअरमन नारायण खांडेकर, रघुनाथ बांडगी, पी. पी. बेळगावकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चोपडे, शिवाजी राक्षे, दिलीप सोहनी, युवराज हुलजी, विजय पाटील, रमाकांत पावशे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला संचालक शिवराज पाटील, रवी दोडण्णवर, सुहास तराळ, यल्लाप्पा बेळगावकर, गजानन ढेकणेकर, विद्याधर कुरणे, सुवर्णा शहापूरकर, माऊती शिगीहळ्ळी, बसवराज इटी, रोहन चौगुले, नितीन हिरेमठ, ज्ञानेश्वर सायनेकर, कमलेश मायाणाचे उपस्थित होते.