महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नानावाडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे लोकार्पण

11:05 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्यवस्थापनाची जबाबदारी ‘लोकमान्य सोसायटी’कडे :  चंद्रकांतदादा पाटील, किरण ठाकुर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

पुणे : स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांच्या पाठपुराव्यांतून साकारलेल्या नानावाडा येथील स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले असून, संग्रहालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’कडे असणार आहे. येत्या 1 जानेवारीपासून हे संग्रहालय सर्वांसाठी खुले होणार असून, नाममात्र शुल्कासह पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीरांची ओळख करून घेण्यासाठी या संग्रहालयाचा मोठा लाभ पुढील पिढीला होईल, असा विश्वास राज्याचे उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे व्यक्त केला. कसबा विधानसभेच्या दिवंगत आमदार कै. मुक्ताताई टिळक यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नानावाडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे लोकार्पण चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. भाजपा नेते सुनील देवधर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर, ‘लोकमान्य सोसायटी’चे प्रादेशिक व्यवस्थापक सुशील जाधव, अभिनेते क्षितीज दाते, भाजपा नेते शैलेश टिळक, कुणाल टिळक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.किरण ठाकुर म्हणाले, आपला वैभवशाली समृद्ध वारसा पुढील पिढीला माहीत व्हावा, या उदात्त हेतूने या संग्रहालयाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. संग्रहालयाची देखभाल व व्यवस्थापन ‘लोकमान्य’कडून उत्तम प्रकारे होईल. शैलेश टिळक व कै. मुक्ताताई टिळक यांनी या संग्रहालयासाठी कशा रितीने पाठपुरावा केला, याबद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. अन्य मान्यवरांनी कै. मुक्ताताई टिळक यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

Advertisement

संग्रहालयाच्या संरक्षण, संवर्धनाचीही जबाबदारी ‘लोकमान्य’कडे

संग्रहालयाचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाची जबाबदारी पुणे महानगरपालिकेकडून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीकडे देण्यात आली आहे. या संग्रहालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लहुजी राघोजी साळवे आणि उमाजी नाईक खोमाणे यांसारख्या स्वातंत्र्यवीरांच्या वस्तू व संबंधित नोंदी जतन करण्यात आल्या आहेत. व्यक्त होतो आणि जितका मोकळेपणाने व्यक्त होईल असे वातावरण असेल तर तितक्या त्वरेने व्याधीतून मुक्त होतो. झपाट्याने वाढणाऱ्या आणि कर्नाटकमधील महत्त्वाच्या बेळगाव शहरात एक नवी वैद्यकीय सुविधा उभी राहिली आहे. दक्षिण बेळगावात सेंट्राकेअर या नावाचे हे हॉस्पिटल एनडीजी सेवासदन या संस्थेच्या विद्यमाने कार्यरत झाले आहे. सगळ्या सुविधा आणि इतरत्र सहसा न आढळणारी आपलेपणाची आणि वैयक्तिक काळजी घेणारी व्यवस्था हे या रुग्णालयाचे वैशिष्ट्या मानता येईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article