For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिनी हेलिकॉप्टर जोडणी केंद्राचे उद्घाटन

06:34 AM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
मिनी हेलिकॉप्टर जोडणी केंद्राचे उद्घाटन
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

कोलार तालुक्यातील वेमगल औद्योगिक वसाहतीत निर्माण करण्यात आलेल्या टाटा एअरबस मिनी हेलिकॉप्टर जोडणी केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युवल मॅक्रॉन हे या कार्यक्रमात सहभागी होतील. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्री कॅथरिन वॉट्रिन हे वेमगल येथील कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.

टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम लि.च्या वतीने वेमगल येथील 16 एकर प्रदेशात मिनी हेलिकॉप्टर जोडणी युनिट स्थापन करण्यात आले आहे. हे देशातील पहिले मिनी नागरी हेलिकॉप्टर जोडणी केंद्र आहे. पहिल्या टप्प्यात एच125 मॉडेलचे 10 हेलिकॉप्टर तयार करण्याची क्षमता या केंद्राची असेल. आगामी कळात उत्पादन क्षमता वाढविण्याची योजना आहे.

Advertisement

Advertisement

.