For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडची-मिरज रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे उद्घाटन

11:10 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुडची मिरज रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे उद्घाटन
Advertisement

पंतप्रधानांची व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थिती

Advertisement

वार्ताहर /घटप्रभा

नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील कुडची-मिरज या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. यानिमित्त मंगळवारी घटप्रभा रेल्वेस्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घटप्रभासह देशातील विविध रेल्वेस्थानकांवरील आधुनिक सुविधा तसेच वन स्टेशन वन प्रोडक्ट अंतर्गत स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला हुबळी येथील नैर्त्रुत्य रेल्वेचे डीआरओसी दीपक बटुलपार उपस्थित होते. देशभरात एकूण 85 हजार कोटी रुपये खर्च करून रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण व नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविला. प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटक आरोग्य धामच्या मुख्य सीईओ डॉ. स्वाती वैद्य आणि धुपदाळ सिद्धारुढ शाखा मठाधीश भीमानंद महास्वामींच्या हस्ते झाले. घटप्रभा रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणामुळे परिसराचाही विकास होणार असल्याचा विश्वास यावेळी डॉ. स्वाती वैद्य यांनी व्यक्त केला. यावेळी डीआरओसीचे सदस्य सुरेश पाटील, रामण्णा हुक्केरी, सुधीर जोडट्टी, रेल्वे विभागाचे अधिकारी मनीष अग्रवाल, सौरभ ठाकुर, प्रसाद कुलकर्णी, रवि मादार, अमित पाटील यांसह इतर उपस्थित होते. बेळगावसह घटप्रभा, खानापूर, कुडची, रायबाग या रेल्वेस्थानकांवर वन स्टेशन वन प्रोडक्ट या योजनेतून स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रेल्वेचा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. घटप्रभासह उगार खुर्द येथीलही रेल्वेस्थानकाचे उद्घाटन या दरम्यान करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.