कोल्हापूर चेंबर चषक स्पर्धेचे उद्घाटन
कोल्हापूर :
झंवर ग्रुप पुरस्कृत चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व चषक अनावरण सोहळा शुक्रवारी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते व झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक नीरज झंवर, जाधव इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक सत्यजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शाहूपुरी जिमखाना ग्राऊंड येथे पार पडलेल्या पहिल्या सत्रातील सामन्यात कोल्हापूर हॉटेल मालक संघ, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन यांनी बाजी मारली.
प्रास्ताविकात चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यापारी-उद्योजकांनी कामाच्या व्यापातून वेळ काढत आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून चेंबर चषक क्रिकेट स्पर्धा भरवल्या जात असल्याचे सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक यांनी व्यापारी-उद्योजकांनी देखील आपली कला दाखवत क्रिकेट खेळाकडे लक्ष द्यावे, शरीर सुदृढ सृढ केले पाहिजे असे सांगत चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक नीरज झंवर, जाधव इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक सत्यजित जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
दुसऱ्या फेरीत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांनी बाजी मारली. स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असून सहप्रायोजक जाधव इंडस्ट्रीज आहे. हॉटेल मालक संघ, इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन, संजय घोडावत ग्रुप, अमित आर. मेडिकल, रिटा आईक्रिम फॅक्टरी, सनी मेडिकेअर एलएलपी, वर्धमान इलेक्ट्रीकल्स, लाईफटाईम सर्व्हिसेस यांचे सहकार्य लाभले.
यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, धनंजय दुग्गे, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, जयेश ओसवाल, राहुल नष्टे, आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, संपत पाटील, प्रकाश पुणेकर, अनिल धडाम, संभाजीराव पोवार, रमेश लालवाणी, तौफीक मुल्लाणी, संजय पाटील, शिवाजीराव पोवार, दादासो कडवेकर, उज्वल नागेशकर, हरिश्चंद्र धोत्रे, राज शेटे आदी उपस्थित होते.