कोल्हापूर कॅन्सर सेन्टरच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया व अद्यावत अतिदक्षता विभागाचे उदघाटन !
कोल्हापूर :
कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचा अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग व अद्यावत अतिदक्षता विभागाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते संपन्न झाले. नवीन शस्त्रक्रिया विभागामध्ये अत्याधुनिक मॉड्युलर ऑपेरेशन थिएटर्स उभारण्यात आले असून त्याव्यतिरिक्त नवीन अतिदक्षता विभागही उभारण्यात आला आहे.
ठराज्यातला एकही माणूस उपचारांअभावी किंवा पैशाअभावी दगावता कामा नये हा एकच उद्देश घेऊन महाराष्ट्र शासन कार्यरत आहेठ असे डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले. ठकोल्हापूर कॅन्सर सेंटर हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अद्यावत कॅन्सर सेंटर असून सर्व स्तरातील जनतेला कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये अत्याधुनिक उपचार मिळतात हीच या हॉस्पिटलची सर्वात मोठी कमाई आहेठ असे गौरवोद्गार डॉ.शेटे यांनी यावेळी काढले. या उदघाट्न समारंभाप्रसंगी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुरज पवार, कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार, भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, डॉ.योगेश अनाप व डॉ.पराग वाटवे आदी उपस्थित होते.
डॉ.सुरज पवार यांनी 25 वर्षांपूर्वी छोट्या नर्सिंग होम रूपात सुरु केलेल्या 4 बेडच्या हॉस्पिटल पासून आत्ताचे 125 बेडचे हॉस्पिटल उभे करताना त्यांना आलेल्या अनेक अडचणी व चिकाटीने समाज कल्याणासाठी सुपर स्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटल यशस्वी करण्याच्या प्रवासाबद्दल संक्षिप्त रूपात माहिती दिली. काळानुसार अत्याधुनिक रेडिएशन मशीन, रोबोटिक शस्त्रक्रिया, बोनमॅरो ट्रान्सप्लांट असे नवीन तंत्रज्ञान सर्वप्रथम कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये उपलब्ध केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
ठमहात्मा फुले योजनेतील उपचारांचे पॅकेज वाढवावेत व जी औषधे योजनेमध्ये देता येत नाहीत त्यांचा देखील समावेश व्हावाठ असे आवाहन आभार मानताना कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ.रेश्मा पवार यांनी केले.
यावेळी भा. ज. पा. चे शहर जिल्हा अध्यक्ष, विजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. समारंभासाठी हॉस्पिटल मधील कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वी 2015 ते 2019 या काळात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून फक्त 45 कोटी निधी दिला जायचा तो वाढवून 598 कोटी देण्यासाठी मी परिश्रम घेतले तसेच 1211 कोटी रुपयांचे काम विविध कंपन्यांच्या चॅरिटी मधून गोळा करून केले असे एकूण 1800 कोटींचा वैद्यकीय निधी वाटला आणि 24 लाख रुग्णांना मदत करता आली याबाबत ओमप्रकाश शेटे यांनी समाधान व्यक्त केले.ठ आगामी काळात आयुष्मान भारत योजनेतून पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल असे प्रतिपादन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले.